बेळगाव : मोदगा आंबेडकर गल्ली येथील तरुण ७ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला आहे. अडीवेप्पा बसप्पा तळगेरी (वय २७) असे त्याचे नाव असून धाब्याला जाऊन येतो असे सांगून तो घरातून निघाला तो परत आलाच नाही. त्याचे नातेवाईक सुरेश तळगेरी यांनी याबाबत मारिहाळ पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.
त्याने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाचा जीन्स परिधान केला असून कन्नड आणि हिंदी भाषेत बोलतो. त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस स्थानकात किंवा मारिहाळ पोलीस स्थानक ०८३१-२४०५२३९ अथवा ९४८०८०४१११ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









