पणजी,प्रतिनिधी
कोमरपंतसरांनी निर्मळ विचार, निर्मळ वाणी कधी सोडली नाही. ते अनेकांचे सदैव प्रेरणा स्रोत बननू राहिले. मराठीवर प्रेम कारण्रायांचे आयुष्य त्यांच्या कर्तृत्वापुढे झुकल्यावर सफल होईल.त्यांनी दिलेले भावनिक नाते, दृष्टी मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद् गार मल्लिकार्जून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी येथे काढले. सव्यसाची समीक्षक, साहित्यिक डॉ.सोमनाथ कोमरपंत यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने, शुक्रवारी गोमंतक साहित्य सेवक मंडळाने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात डॉ. मनोज कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. कामत यांनी सांगितले की,जे चांगले घडत आहे त्याकडे कोमरपंतसर सौंदर्यवृत्तीने,विशाल दृष्टीने पहात गेले व स्वच्छ, सुंदर, भव्य-दिव्य समाजाला देत गेले.
डॉ. कोमरपंत म्हणाले, गुऊवर्यांची मायेची पाखर ज्ञानापेक्षा वात्सल्याचा स्पर्श अधिक देऊन गेली. मला संजीवक शक्ती देणारे अनेक आहेत तोपर्यंत मरणाची भीती नाही.जोपर्यंत दुस्रयांसाठी तिळ तिळ तुटणारे हृदय असते तोपर्यंत आत्म्याला मरण नाही. भारताचा विद्येचा वारसा हा ज्ञानमय वारसा मला लाभला. ज्ञानमय परंपरा आज कोप्रयात पडली आहे आणि उपयुक्तता फक्त जाणवते, असे होता कामा नये. वाचनाने माणूस उन्नत होतो. मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी स्वागत केले. कोषाध्यक्ष राजमोहन शेट्यो यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले. प्रकाश तळवडेकर यांनी डॉ. कोमरपंत यांच्यावर एक कविता वाचली.सौ.मंदा कोमरपंत यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यवाह सुहास बेळेकर यानी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान केला.









