प्रतिनिधी /पणजी
पणजी येथे स्मार्ट सिटीच्या खड्ड्यात काल शुक्रवारी आणखिन एक टँकर कलंडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कुणीही जखमी झालेला नसला तरी टँकरचे नुकसान झाले आहे. ठिकठिकणी खंडलेल्या खड्यात वाहने कलंडू लागल्याने वाहन चालकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्यामध्यभागी ख•s मारून ठेवलेले आहेत. काही दिवसांपूर्वी चिरेवाहक ट्रक खड्यात कलंडल्यानंतर चार कामगार जखमी झाले होते. आता सांतिनेझ भागात असाच अपघात घडला असून सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. टोंक-सांतिनेझ येथून कांपाल येथे जाताना हा टँकर खड्यात कलंडला. त्यानंतर क्रेनच्या मदतीने टँकर बाहेर काढण्यात आला. मात्र या अपघाताबाबत कोणतीही पोलिस तक्रार झालेली नाही. या अपघातानंतर त्या पिरसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
अपघातानंतर त्या ठिकाणी असलेल्या अभियंत्याला स्थानिकांनी धारवरे धरले. मात्र, सदर अभियंत्यांनी जबाबदारी झटकत टँकरचालकाचीच चूक असल्याचा दावा केला. काम सुरू असताना वाहने या रस्त्यावरून कशी जातात? आम्ही फलक लावले आहते. मात्र, वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात, असे म्हणत तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, सदर कामे त्वरीत पूर्ण करावी, या कामांना आता आम्ही कंटाळलो, असे मत स्थानिक व्यक्त करताना दिसत आहेत.









