खुदा हाफिज फेम अभिनेत्री अन् दृश्यम 2 चा दिग्दर्शक
‘खुदा हाफिज’ फेम अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयने प्रियकर अभिषेक पाठक याच्यासोबत विवाह केला आहे. अभिषेकने दृश्यम 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अभिषेक आणि शिवालिकाचा विवाह 9 फेब्रुवारीला पार पडला आहे. दोघांनीही स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटवर विवाहसोहळय़ाची छायाचित्रे शेअर केली आहेत.
शिवालिका आणि अभिषेक यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन 8 फेब्रुवारीला पार पडले होते. विवाहसोहळय़ात अजय देवगण देखील सामील होता. ‘आपण प्रेमाला शोधत नाही, तर प्रेम आपल्याला शोधून काढते, प्रेम हे नशीबावर विश्वास ठेवणाऱयांना मिळते’ असे शिवालिकाने छायाचित्रे शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

अभिषेक पाठक आणि शिवालिका यांच्या या विवाहसोहळय़ात जवळचा मित्रपरिवार, कुटुंबीय आणि चित्रपटसृष्टीतीशी संबंधित काही लोक सामील झाले. या सोहळय़ात अजय देवगण हा स्वतःचा पुतण्या अमन देवगण, कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, विद्युत जामवाल, सनी सिंह, भूषण कुमार, दिग्दर्शक लव रंजन, इशिता राज शर्मा यांच्यासह सामील झाला होता.
अभिषेक आणि शिवालिका हे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. अभिषेकने ‘खुदा हाफिज’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात शिवालिका आणि विद्युत जामवाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती.









