Blood Donation Camp on 14th February in District Sessions Court
सर्व वकिलांनी उपस्थित राहावे – प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे आवाहन
14 फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . ९. ३० ते १. ०० या वेळेत हे शिबीर होणार आहे . सदर रक्तदान शिबिरास वकील लोकांची उपस्थिती प्रार्थनीय असून याबाबत प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी सगळ्या वकिलांनी उपस्थित राहण्याबाबत आवाहन केलेले आहे . सदर रक्तदान शिबिरात 100 रक्तादाते रक्तदान करतील हे उद्दिष्ट ठेवलेले आहे . तरी आपण या रक्तदान शिबिरात अवश्य भाग घ्यावा व शिबीर यशस्वी करण्यात हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









