ठाणे महाराष्ट्रातील 23 वर्षीय युवकाला अटक
प्रतिनिधी /मडगाव
महाराष्टातील ठाणे (मुंबई) येथील 23 वर्षीय ओंकार आश्विनकुमार चंदाक्कर याला फातोर्डा पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा अतिशय कडक म्हणून ओळखण्यात येणारा अमली पदार्थ जप्त केला. ही घटना मंगळवारी मडगावच्या घाऊक मासळी मार्केजवळ घडली. अमूक वर्णन असलेली एक व्यक्ती अमली पदार्थ घेऊन येणार अशी खबर गुप्त पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार फातोर्डा पोलीस संशयित व्यक्तीची वाट पाहात होते. काही वेळाने वर्णन केलेली सदर व्यक्ती येत असल्याचे पोलिसांना दिसताच त्यानी संशयावरुन या युवकाला हटकले तेव्हा संशयित बिचकला.
पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाना समाधानकारकरित्या उत्तरे देता येत नसल्याचे पाहून पोलिसांनी त्याला फातोर्डा पोलीस स्थानकात नेवून त्याची सखोल चौकशी केली आणि अजूनही सुरु आहे. एलएसडी नावाचा अतिशय कडक म्हणून ओळखण्यात येणारा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गावकर पुढील तपास करीत आहेत.









