माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर
प्रतिनिधी/ सातारा
कामगारांचे प्रश्न आजही तसेच आहेत. ते प्रश्न सोडवले गेले नाहीत. ज्या कामगारांच्या जीवावर काही लोक आमदार, मंत्री झाले आहेत. कामगार मात्र देशोधडीला लागले. सो कॉल्ड कामगार नेते मोठे झाले, असा टोला नाव न घेता माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी जिह्यातील माथाडी नेत्यांना लगावला. दरम्यान, त्यांनी सुरक्षा रक्षकांचा प्रश्न कामगार मंत्री सुरेशराव खाडे यांनी मार्गी लावला असून लवकर कामगार भवन नव्या जागेत उभे राहिल. ईएसआयचेही ऊग्णालय उभे राहिल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिजित येळगावकर, रमेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. येळगावकर म्हणाले, सुरक्षा रक्षकांचा प्रश्न गेली अनेक वर्ष भेडसावत होता. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने सोडवणूक करण्यासाठी नामदेवराव घाडगे सुरक्षा रक्षक मंडळ आा†ण जनरल कामगार युनियन स्थापन करण्यात आले आहे. त्याच्या अध्यक्षस्थानी अभिजित येळगावकर हे आहेत. मंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत परवा बैठक झाली.
त्या बैठकीत सुरक्षा रक्षकांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. सुरक्षा रक्षकांना 2019 पासून पगार ा†दला गेलेला नाही. त्यांनी करायचे काय?, त्याची थकबाकी 4 कोटी 31 लाख इतकी पेंडीग आहे. ा†कती भयानक आहे. खाडे साहेबांनी सर्व जवळून पाहिले आहे. त्यांनी त्याची दखल घेतली. त्यांनी लगेच आदेश दिले आहेत. कामगारांचे पगार वेळेत करण्यासाठी सुचना दिल्या आहेत. सातारा जिह्यासाठी स्वतंत्र सुरक्षा रक्षक मंडळ मंजूर करण्यात आले आहे. काही दिवसात त्याची अंमलबजावणी होईल. शासकीय कार्यालयामध्ये जेथे जेथे आवश्यकता आहेत. तेथे सुरक्षा रक्षक हे शासनाच्या या मंडळाच्या माध्यमातूनच पुरवठा केला जाईल. त्यामुळे पुढाऱ्यांकडून होणारी लुटालुट थांबेल. सुरक्षा रक्षक पदासाठी राज्यातून परीक्षा झाल्या. परंतु अद्यापही नोकरीवर ऊजू झाले नाही. 700 वेटींगची लिस्ट चार जिह्यात आहे. ही यादी जिल्हावाईज करण्यात आली असून त्यासही मान्यता दिली आहे.
आज कामगारांचे प्रश्न तसेच पडून आहेत. जिह्यातील माथाडीचे नेते मोठे झाले. आमदार झाले मंत्री झाले सो कॉल्ड कामगार नेते मोठे झाले परंतु कामगार देशोधडीला लागला अशी टीप्पणीही त्यांनी नाव न घेता केली.
तरच कामगारांचे शोषण थांबेल
माजी आमदार दिलीपराव येळगाकर म्हणाले, सातारचे आज जे कामगार भवन आहे त्यामध्ये गेले तरी लाज वाटते. कामगार भवन बांधायला विभागाकडे पैसा आहे. शासनाला लेव्हीच्या स्वऊपात गेल्या पाच महिन्यात सात कोटी मिळालेत. त्या निधीतून कामगार भवन उभारावे अशी मागणी केली आहे. त्याकरता जागा सुचवली असून मंत्र्यांनी मंजुरी ा†दली आहे. त्यात ईएसआय हॉस्पिटल व्हावे. जेणेकऊन कामगारांचे शोषण थांबेल, असेही त्यांनी सांगितले.








