अधिक काळ कुणीच राहू शकत नाही
जगातील सर्वाधिक शांतता असलेल्या ठिकाणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हे ठिकाण इतके शांत आहे की कुठलाच व्यक्ती येथे अधिक काळ थांबू शकत नाही. या ठिकाणी गेल्यावर व्यक्तीला स्वतःच्या शरीरातून निर्माण होणारे अनेक प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागतात. प्रत्यक्षात ही एक खोली असून याची निर्मिती मायक्रोसॉफ्टने 2015 साली केली होती. या खोलीची नोंद आता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

ही खोली वॉशिंग्टनच्या रेडमंडमध्ये असून जे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एनेचोइक चेम्बर आहे. एनेचोइकचा अर्थ कुठल्याही प्रकारचा प्रतिध्वनि ऐकू न येणे असा होतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास या खोलीच्या आता कुठल्याही प्रकारचा आवाज किंवा इलेक्टोमॅग्नेटिक वेव्ह्ज येऊ शकत नाहीत. आजपर्यंत कुणीच या खोलीत एक तासाहून अधिक काळ थांबू शकलेला नाही.
या खोलीत थांबलेल्या लोकांना स्वतःची हृदयगती ऐकू येऊ लागली, तर काही लोकांना रक्तप्रवाह आणि हाडांद्वारे होणारा आवाजही स्पष्टपणे ऐकू येत होतो. या खोलीत येताच व्यक्तीला बाहेरील गोंगाट ऐकू येत नाही. याचमुळै लोक स्वतःच्या शरीरात निर्माण होणारे अनेक प्रकारचे आवाज ऐकू शकतात. या खोलीत जर कुणी स्वतःची मान फिरविली तरीही त्याचा आवाज तो ऐकू येतो. एवढेच नव्हे तर स्वतःच्या श्वसनाचा आवाजही ऐकता येतो.
ही खोली काँक्रिट आणि स्टीलच्या 6 आच्छादनांनी तयार करण्यात आली आहे. तर या खोलीनजीकच्या इमारतीमधील वातावरण पूर्णपणे वेगळे आहे. तर या खोलीत स्प्रिंग्स देखील आहेत.









