मुंबई
डिजिटल वित्त सेवा देणाऱया पेटीएमचे समभाग तीन महिन्यांच्या उच्चांकावरती पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये कंपनीचा समभाग 28 टक्के इतका वाढला आहे. बीएसईवर मंगळवारी इंट्रा डे दरम्यान समभागाचा भाव 20 टक्के वाढत 669 रुपयांवर पोहोचला होता. पेटीएमने तिसऱया तिमाहीमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसून आला. 18 ऑक्टोबर 2022 नंतर समभागाने नवी उंची गाठली आहे.









