Rahul Gandhi गौतम अदानी यांच्या गेल्या आठ वर्षांतील सपत्तीच्या वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्योगपती गौतम अदानीशी काय नाते आहे असा सवाल केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या विमानातून प्रवास करायचे, पण आता अदानी मोदीजींच्या विमानातून प्रवास करतात. अदानींनी इलेक्टोरल बाँडद्वारे भाजपला पैसे दिल्याचा थेट आरोप राहुल गांधीं यांनी केला आहे. ते आज लोकसभेत संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रात बोलत होते.
हिंडनबर्ग प्रकरणानंतर राजकिय वातावरण तापले असतानाच कॉंग्रसच्या खासदारांनी संसदेत अदानी- हिंडनबर्ग प्रकरणाची चौकशी संसदेकडून किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून व्हावी हा मागणी उचलून धरली आहे तर भाजपचे खासदार राष्ट्रपतींच्या आद्यादेशावर चर्चा व्हावी यासाठी आग्रही आहेत.
पुढे बोलताना वायनाडचे खासदार राहूल गांधी म्हणाले, “अदानी- हिंडनबर्ग हे प्रकरण आधी गुजरातचे होते, नंतर भारताचे झाले आणि आता आंतरराष्ट्रीय झाले आहे. गौतम अदानी 2014 मध्ये जागतिक श्रीमंतांच्या यादीत 609 व्या क्रमांकावर होते. आणि त्यानंतर ते 2022 मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत बनले आहेत. मला आश्चर्य वाटते की त्याच्या बाजूने काही चमत्कार झाला आहे का?” हिंडनबर्ग अहवाल शेल कंपन्यांचा संदर्भ मिळतो. या शेल कंपन्या कोणाच्या आहेत हे शोधण्याची जबाबदारी सरकारची आहे,” असे राहुल गांधी लोकसभेत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, “केंद्रशासनाने अदानी समूहासाठी नियम बदलले आहेत. त्यामुळेच अदानी उद्योग समुहाला भारतातील सर्वात जास्त व्यवसाय असणाऱ्या मुंबई विमानतळासह 6 विमानतळे मिळाली.”
अग्निवीर योजना लष्करावर लादली जात असल्याचेही राहूल गांधी यांनी म्हटले आहे. “निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अग्निवीर योजना आरएसएस आणि गृह मंत्रालयाकडून आली आहे, लष्कराकडून नाही असे सांगितले आहे.” अग्निवीर योजना लष्करावर लादली जात असल्याचेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, भाजपचे सदस्य सी.पी. जोशी यांनी ‘सती’ प्रथेवर केलेल्या काही संदर्भांवर विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दीड वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आपल्या भाषणादरम्यान जोशी यांनी मेवाडची राणी पद्मावती हिचा संदर्भ देऊन आक्रमणकर्त्या अल्लाउद्दीन खिलजीपासून आपल्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी तिने स्वतःला आगीमध्ये झोकून दिले होते. असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी सदस्यांनी सीपी जोशींनी ‘सती’ प्रथेचा पुरस्कार केला असल्याचा आरोप केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









