Eyes Care Tips : दैनंदिन जीवनात आपण अशा काही चुका करतो ज्याचा आपल्या डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय आपल्काया अशा काही वाईट सवयी असतात ज्याचा डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशावेळी लोकांनी या सवयी आणि चुकांबद्दल जागरूक राहणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या सवयी किंवा चुकांमुळे आपले डोळे कमकुवत होऊ शकतात याविषयी सांगणार आहोत.
त्या सवयी काय आहेत?
-काही लोक पुन्हा पुन्हा डोळे चोळतात.डोळे चोळल्याने डोळे कमजोर होऊ शकतात.त्याचबरोबर पापण्याही तुटू लागतात.त्यामुळे डोळे चोळणे टाळावे.
-तुम्हाला जर चष्मा असेल तर तुम्ही दर 6 महिन्यांनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. काही लोक चष्मा घातल्यानंतर डोळ्यांची तपासणी लवकर करत नाहीत. यामुळे डोळ्यांचा नंबर वाढण्याची शक्यता जादा असते.
-बऱ्याचवेळा लोक जास्त प्रमाणात पॅकेज केलेले अन्न किंवा जंक फूड खातात. ज्यामुळे आवश्यक पोषक त्यांच्या शरीरात पोहोचू शकत नाहीत.आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील डोळे कमकुवत होऊ शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात झिंक,ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स इत्यादी पोषक घटकांचा समावेश केला पाहिजे.
-बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरतात. मोबाईल बघत असताना झोपेची वेळ निघून जाते. उशीर झाल्यामुळे झोपही पूर्ण होत नाही. परिणामी डोळ्यांवर ताण येतो. डोळे कमकुवत होतात. व्यक्तीला किमान 8 ते 9 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.यामुळे डोळ्यांनाही भरपूर विश्रांती मिळते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









