पाच लाखांचे नुकसान
Asaniya cashew garden caught fire and 500 cuttings were burnt
हातातोंडाशी पीक आलेल्या काजूच्या बागेला अचानक आग लागून सुमारे ५०० काजूची कलमे भस्म सात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी असनिये गावठवाडी नजीक घडली.येथील प्रगतशील बागायतदार दिनकर चंद्रकांत सावंत यांची सुमारे एक हजार काजू कलमे असलेली बाग आहे. काजू बियानी बहरलेल्या या बागेला आग लागल्याचे समजताच सावंत कुटुंबियांसह शेजाऱ्यांनी धाव घेतली. मात्र आगिने रौद्ररूप धारण केल्यामुळे सुमारे ५०० कलमे या अग्निप्रलयात भस्मसात झाली. सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्टा केल्यामुळेच उर्वरित काजूची कलमे या आगीपासून वाचली. मात्र या आगीत सावंत कुटुंबीयांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. घटनास्थळी सरपंच रेश्मा सावंत, तलाठी श्री भिंगारे, कृषी सहाय्यक श्री माळी आदींनी घटनास्थळी भेट दिली.
ओटवणे प्रतिनिधी









