पुणे / वार्ताहर :
एका भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पुणे शहरातील येरवडा परिसरात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
प्रकाशचंद्र लक्ष्मणराव तेलंग (वय 73 रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रज्ञा तेलंग (वय 33) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशचंद्र तेलंग हे रविवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर परिसरात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगातील मोटार चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तेलंग यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड अधिक तपास करीत आहेत.








