गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंद
2 आठवडय़ांर्पी जगातील सर्वात वृद्ध श्वान होण्याचा मान स्पाइक नावाच्या श्वानाला प्राप्त होता, परंतु आता त्याहून अधिक वृद्ध श्वान सापडला आहे. पोर्तुगालच्या बॉबी नावाच्या श्वानाचे 1 फेब्रुवारी 2023 रोजी वय 30 वर्षे 266 दिवस इतके होते. बॉबी हा सर्वात वृद्ध जिवंत श्वान ठरला आहे.
बॉबी पोर्तुगालच्या लीरिया प्रांतातील कॉनकिरोज शहरातील एका गावात कोस्टा कुटुंबासोबत राहतो. पशूंची देखभाल करणारा हा गार्जियन डॉग आहे. या प्रजातीच्या श्वानाचे आर्युमान सर्वसाधारणपणे 12-14 वर्षांदरम्यान असते. राफीरो डो एलनतेजो या प्रजातीचा हा श्वान आहे.

बॉबीने जवळपास एक शतक जुना विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वं हा विक्रम ऑस्ट्रेलियन कॅटल डॉग ब्ल्यूईच्या नावावर होता. ब्लूई 1910 ते 1939 पर्यंत जगला होता. त्याचे आयुष्य 29 वर्षे 5 महिने इतके होते. बॉबीच्या जन्माची नोंद लीरियाच्या वेटरीनरी मेडिकल सर्व्हिस ऑफ द लीरिया म्युनिसिपालिटीत नोंद आहे.
बॉबी 11 मे 1992 रोजी जन्मला होता. त्याच्या वयाची पुष्टी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने केली आहे. तसेच पोर्तुगाल सरकारने देखील वय योग्य असल्याचे म्हटले आहे. जन्मावेळी या श्वानाला बेवारस स्थितीत सोडून देण्यात आले होते, परंतु आता तो कोस्टा कुटुंबाचा पाळीव श्वान आहे. आमच्या घरात बॉबीला कधीच बांधण्यात आले नाही. तसेच त्याला चेनही घालण्यात आली नसल्याचे कोस्टा कुटुंबाकडून सांगण्यात आले.









