Grandparents Day will be celebrated in all the schools of the state!
शासनाचा नवा अध्यादेश ;आजी आजोबा संमेलन भरवावे ही संकल्पना कवी विठ्ठल कदम यांनी मांडली होती
राज्य शासनाने आता राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिन साजरा करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. 10 सप्टेंबर 2023 हा दिन आजी आजोबा दिन म्हणून ओळखला जातो . त्या दिवशी राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिन साजरा होणार . आजी आजोबा संमेलन प्रथम शाळांमध्ये भरण्याची संकल्पना जिल्हा परिषद शाळा नंबर एक कुणकेरी येथील उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक कवी विठ्ठल कदम यांनी सन 2016 पासून सुरू केली होती. दरवर्षी ते आजी आजोबा संमेलन भरवतात. आणि ही आजी आजोबांची संवाद संमेलन भरवण्याची संकल्पना सावंतवाडीच्या ज्येष्ठ नागरिक संघाला भावली . आणि त्याने आजी आजोबा दिन साजरा करावा असा प्रस्ताव आणि अहवाल शासनाकडे पाठवला. आणि तशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे जेष्ठ नागरिक संघाने केली आणि त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दोन फेब्रुवारीला हा दिन साजरा करावा असा अध्यादेश जारी केला आहे . त्यामुळे आता शाळांमध्ये होणार आजी आजोबा दिन साजरा आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक संघाचे मागणीला मूर्त स्वरूप आले असून कवी विठ्ठल कदम यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









