Degve Shree Dev Sthapeshwar -Mahalakshmi annual fair on 6th February
48 खेड्याचा अधिपती अशी आहे ओळख
48 खेड्याचा अधिपती असलेल्या डेगवे येथील श्री देव स्थापेश्वर -महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक 6 फेब्रुवारीला होणार आहे. यानिमित्ताने सकाळपासून धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री पालखी प्रदक्षिणा होणार आहे .तसेच देवेद्र नाईक संचलित चेदवणकर दशावतार नाट्य कंपनीचा पतिव्रत्य नाट्यप्रयोग होणार आहे .जत्त्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसराची साफसफाई ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे तसेच मंदिरा सभोवती विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. जत्रोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री देव स्थापेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट तर्फे तसेच डेगवे ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









