Maharashtra Pune Bypoll Election 2023 : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी भाजपकडून हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मविआकडून कसबा चिंचवडसाठी उमेदवार निश्चित केल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. कसब्यात कॉंग्रेसचे धंगेकर तर चिंचवडला राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांची निवड करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
कोण आहेत अश्विनी जगताप
अश्विनी जगताप मुळच्या साताऱ्याच्या आहेत.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या त्या पत्नी आहेत.
प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा
पहिल्यांदाचा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.
राहुल कलाटे कोण आहेत
शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन टर्म नगरसेवक
शिवसेनेचे शहराध्यक्ष होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शिवसेनेचे गटनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
2014 आणि 2019 मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी निवडणूक लढवली.
2014 मध्ये शिवसेना भाजप युती असताना लक्ष्मण जगतापांविरोधात बंडखोरी केली होती.
हेमंत रासने कोण आहेत
पुणे पालिकेत भाजपचे नगरसेवक
पुणे पालिकेत भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष
सलग दुसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले
रवींद्र धंगेकर कोण आहेत
शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेस पक्षातून चारवेळा नगरसेवक पद भूषविले
2009 आणि 2014 मध्ये मनसेकडून कसबा विधानसभा निवडणूक लढवली.
2017 मध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश
Previous Articleअँब्युलन्स आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात रुग्णाचा जागीच मृत्यू
Next Article ठरलं! कसबा, चिंचवडसाठी भाजपचे उमेदवार जाहीर








