KDCC ED Raid : कोल्हापूर जिल्हा बँकेतील कर्मचारी सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका आला आहे .ईडीकडून काल 30 तास चौकशी सुरू असताना लाड बँकेत कार्यरत होते.आज सकाळी कर्मचाऱ्यांनी एक तास काम बंद आंदोलन करून निषेध केला होता. दरम्यान आज सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेमधून ईडीचे अधिकाऱ्यांनी तब्बल 30 तास अधिकाऱ्यांची चौकशी केली. चौकशी दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली असून, प्रत्येक कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली. यावेळी कर्मचाऱ्यांना शाखेबाहेर काढण्यात आले होते.दरम्यान, चौकशीसाठी जिल्हा बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या कारवाई वेळी सुनील लाड हे बॅंंकेतच उपस्थित होते.
Previous Articleकाय अन्याय झाला, अजित पवारांनी सांगावे
Next Article पेन्शन हवीच, पण सुधारित!









