A case has been filed against the unknown perpetrators
फासकीत अडकलेला बिबट्या वैद्यकीय निरीक्षणामध्ये
आचरा पारवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या कुंपणात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या फासात भक्षाच्या शोधात आलेला बिबट्या अडकून पडला होता. या प्रकरणी फासकी लावणा-या अज्ञात इसमा विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फासकी लावणा-या इसमाचा कसून शोध घेऊन त्यावर कायदया अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अमृत शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे.
आचरा येथील फासकीत अडकलेला बिबट्याची पशुसंवर्धन कुडाळ डॉ. विद्याधर ठाकूर यांचेकडून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर निरीक्षणामध्ये ठेवण्यात आलेला असून वैद्यकीयदृष्ट्या फिट होताच त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे. या पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन मध्ये उपवनसंरक्षक (प्रादे) वनविभाग सावंतवाडी, नागेश दप्तरदार वन्यजीव रक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्री अमृत शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ, श्री. मदन क्षिरसागर वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, श्री. श्री. पां. परीट वनपाल मालवण, श्री. धु.रा.कोळेकर वनपाल नेरूर, श्री. सा.स. कांबळे वनपाल मठ, श्री. शरद कांबळे वनरक्षक धामापूर श्री. सुरेश अबदारे लिपीक श्री. अनिल परब वनमजुर मालवण, श्री. राहूल मयेकर सहभागी झाले असल्याची त्यांनी माहिती दिली.
आचरा / प्रतिनिधी









