प्रतिनिधी /पणजी
वाहन अपघात जखमी झालेल्या गोवा मोटारसायकल टॅक्सी रायर्डस् असोसिएशनचे माशेल भागातील एक सदस्य अशोक नाईक यांना संघटनेच्या जीवनदायीनी योजनेतून नुकतीच आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. माशेल येथील अशोक नाईक याना एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्या दिवसापासून ते गेला दीडमहिना घरीच बेकार आहेत. असे बरेच सदस्य जखमी अवस्थेत घरीच बेकार आहेत. या काळात त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणारी जीवनदायीनी योजना संघटनेतर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारा अशोक नाईक यांना 5,370 रु. आर्थिक मदतीचा धनादेश संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला.









