Budget Session 2023 : विकासाच्या कर्तव्याचा मार्ग अवलंबत माझे सरकार काही वर्षांत नऊ वर्षे पूर्ण करेल. माझ्या सरकारच्या जवळपास नऊ वर्षात भारतातील जनतेने प्रथमच अनेक बदल पाहिले आहेत. यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताचा आत्मविश्वास पहिल्यांदाच उंचावला आहे. जो भारत पूर्वी बहुतेक समस्या सोडवण्यासाठी इतरांवर अवलंबून होता. आज तो इतरांच्या समस्यांवर उपाय बनत आहे. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो ‘आत्मनिर्भर’ असेल आणि आपली मानवतावादी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने सुरु झाली. या अभिभाषणात त्यांनी संबोधन केले.
दौप्रदी मुर्मू म्हणाल्या की, 2047 पर्यंत आपल्याला असे राष्ट्र घडवायचे आहे जे भूतकाळातील अभिमानाशी जोडलेले असेल आणि ज्यामध्ये आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असतील. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो ‘आत्मनिर्भर’ असेल आणि आपली मानवतावादी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल.माझे सरकार राष्ट्र उभारणीचे कर्तव्य पार पाडण्यात गुंतले आहे.स्वप्ने पूर्ण करणारे हे सरकार आहे. आज भारतात प्रामाणिकपणाचे पालन करणारे सरकार आहे.आज भारतामध्ये गरिबीचे कायमस्वरूपी निराकरण आणि त्यांच्या कायमस्वरूपी सक्षमीकरणासाठी काम करणारे सरकार असल्याचेही त्या म्हणाल्या.
Previous Articleअरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी
Next Article येरवड्याच्या बालसुधारगृहातून कोयता गँग फरार









