खासगी डॉक्टर – नागरिकांच्या बैठकीत मागणी
जांबोटी : जांबोटी या ठिकाणी रात्रीच्या वेळी कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रात्रीच्या वेळी आरोग्य सेवेअभावी ऊग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून खासगी डॉक्टरांनी रात्रीच्या वेळी देखील वैद्यकीय सुविधा पुरवावी, अशी मागणी जांबोटी गावातील नागरिकांनी ग्राम पंचायत व खासगी डॉक्टरांच्या बैठकीत केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जांबोटी ग्रा.पं.अध्यक्ष महेश गुरव होते.
जांबोटी हे महसूल विभागाचे मुख्यालय असून पश्चिम भागातील अनेक दुर्गम खेड्यांचा या गावांशी बाजारहाट व शासकीय कामकाजानिमित्त मोठ्या प्रमाणात रोजचा संपर्क आहे. तसेच बेळगाव-चोर्ला, पणजी हा महामार्ग जांबोटी गावातून गेला असल्यामुळे गोव्याला जाणाऱ्या प्रवासी व पर्यटकांची संख्यादेखील मोठी आहे. जांबोटी या ठिकाणी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा उपलब्ध नाही. परंतु या ठिकाणी बरेचशे खासगी डॉक्टर ऊग्णांना वैद्यकीय सुविधा पुरवितात. या ठिकाणी कार्यरत असलेले खासगी डॉक्टर केवळ दिवसाच ऊग्णावर उपचार करतात. सायंकाळी सात वाजल्यानंतर जांबोटी येथे एकही डॉक्टर ऊग्णावर उपचार करण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या ऊग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.त्यामुळे खासगी डॉक्टरांनी रात्रीच्यावेळीही जांबोटी येथे आरोग्य सेवा पुरवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. बेळगाव-चोर्ला रस्त्यावर देखील रात्री व दिवसादेखील मोठ्या प्रमाणात अपघात होतात. यामध्ये अनेक नागरिकांचा बळी जातो. रात्रीच्या वेळी या दुर्गम भागात वाहतूक व्यवस्था देखील बेताचीच असल्यामुळे तातडीच्या उपचाराअभावी अनेक ऊग्णांचा बळी जात आहे. त्यामुळे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा देखील उपलब्ध करून गरीब ऊग्णांची होणारी आर्थिक हेळसांड दूर करावी, अशी मागणी माजी सदस्य शंकर सडेकर यांनी केली. रात्रीच्या वेळी ऊग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रभारी पीडीओ सुनील अंबारे यांना दिले. बैठकीला मनोहर डांगे, गणपती कोटीभास्कर, सुदेश कुडतुरकर, माऊती पेडणेकर, प्रमोद किनारी, नाना सुतार, अण्णासाहेब कुडतुरकर, शंकर सडेकर, मिलिंद डांगे, दर्शन नाईक, दत्ता नाईक, प्रकाश ओउळकर, रसूल नाईक, विनायक कोटीभास्कर, मनोहर गोवेकर, रामचंद्र कोलिककर, मिथुन कुंभार, मोहन पारवडकर उपस्थित होते.









