पुणे : आपल्या संकुचितपणामुळे धर्मात भेद वाढत आहे. बाहेरचे आपण उदारपणे स्विकारत नाही आणि आपले म्हणून जे काही आहे ते जगभर पसरवित नाही. म्हणूनच मराठी साहित्य सर्वश्रेष्ठ असतानाही त्यास देशातही प्रसिद्धी मिळत नाही. हा संकुचितपणा मराठीसाठी घातक आहे, अशा शब्दांत डॉ. भालचंद्र नेमाडे (Dr. Bhalchandra Nemade) यांनी सुनावले. तसेच संकुचितपणा सोडून उदारमतवादी व्हा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे (अमेरिका) आयोजित साहित्य व समाजकार्य पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. नेमाडे बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्राभिमान आणि देशाभिमान या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. राष्ट्रीयीकरणामुळे जगात काही देशाचे नुकसान झाले आहे. प्रत्येक देश आणि राज्यातील लोक चांगलेच असतात. राष्ट्राच्या नावावर त्यांची मने कलुषित करणारे लोक खराब असतात. जगभरात आहे रे आणि नाही रे वर्ग आहे. समाज कार्यातून फार काही घडत नाही, असा माझा अनुभव आहे. कादंबरी हा युरोपियन प्रकार नसून, मराठी प्रकार आहे. मराठी संस्कृती जगभर पसरली आहे. मराठी लोकांनी खुप क्रांती केली असल्याचेही डॉ. नेमाडे यांनी नमूद केले.
अधिक वाचा : उजनीचा उजवा कालवा फुटला; शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली, पिकांचं मोठं नुकसान
संत एकनाथ डोहात बुडाले नाहीत, संत तुकाराम पुष्पक विमानातून गेले नाहीत, तर त्यांना मारले गेले. संत ज्ञानेश्वरांना जिवंत समाधी घ्यावी लागली. संत एकनाथापासून ते डॉ. नरेंद्र दाभोलकरापर्यंतचा हा इतिहास आहे. त्यामुळे खिपे कापणारा चोर सापडतो. मात्र दाभोलकरांचा मारेकरी दहा वर्षांनंतरही सापडत नाही, याला संस्कृती म्हणायचे का? असा सवालही डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी यावेळी उपस्थित केला.