वृत्तसंस्था/ पुणे
अखिल भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे संयुक्त सरचिटणीस पवन सिंग यांची सलग तिसऱयांदा आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या पंच समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
म्युनिचमध्ये 24 जानेवारी रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या निवडणुकीत पुण्याच्या पवन सिंग यांची सलग तिसऱयांदा पंच समिती सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या पंच समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे. या पंच समितीमध्ये आपली निवड झाल्याबद्दल पवन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनचे आभार मानले आहे. या पंच समिती चेअरमनपदी ब्रिज घिसलेनी यांची निवड करण्यात आली आहे.









