पासधारकांना करता येणार अतिरिक्त दिवस प्रवास
प्रतिनिधी/ बेळगाव
परिवहन मंडळाने मासिक, द्वैमासिक आणि त्रैमासिक बसपासच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे पासधारकांना अधिक दिवस प्रवास करता येणार आहे. वायव्य परिवहन मंडळाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पासधारक, नोकरदार कामगारांना दिलासा मिळाला आहे.
बसपासच्या माध्यमातून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. अशा बसपासधारकांना याचा लाभ होणार आहे. मासिक, द्वैमासिक आणि त्रैमासिक बसपासच्या मुदतीत दोन ते दहा दिवसांची मुदत वाढवून दिली जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांना बसपासच्या माध्यमातून अतिरिक्त दिवस प्रवास करता येणार आहे.
मासिक बसपासच्या माध्यमातून 12 हजारांहून अधिक कर्मचारी दैनंदिन प्रवास करतात. या सर्व कर्मचाऱ्यांना आता वाढीव मुदतीचे बसपास वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना जादा दिवस बसपासच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर सर्व व्यवसाय, उद्योगधंदे पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर निपाणी, संकेश्वर, गोकाक, हुक्केरी, मुडलगी, कित्तूर, चिकोडी आदी भागातून बेळगावला येणाऱ्या पासधारक कामगारांची संख्या अधिक आहे. या बसपासधारकांना अतिरिक्त मुदतीचा लाभ घेता येणार आहे.
शहरासाठी 700 आणि उपनगरासाठी 1000 रुपये असलेल्या मासिक बसपासची मुदत 30 ऐवजी 32 दिवस करण्यात आली आहे. द्वैमासिक बसपासची मुदत 60 वरून 65 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर त्रैमासिक बसपासची मुदत 90 वरून 100 दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना या अतिरिक्त मुदतीचा लाभ घेता येणार आहे.
के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)
परिवहनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बसपासच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बसपासधारक नोकरदार आणि कामगारांना याचा लाभ घेता येणार आहे. मासिक, द्वैमासिक आणि त्रैमासिक बसपास मुदतीत वाढ करण्यात आली आहे.









