He came from abroad and “he” started studying in Marathi school!
आजगावच्या जि . प . शाळेत चौथीमध्ये शिकतोय रशियाचा मिरॉन
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आजगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी मातृभाषेतून शिक्षण घेतो आहे रशियन मुलगा . एकीकडे वाढते इंग्रजी माध्यमांचे फॅड त्यामुळे मराठी शाळेतली विद्यार्थी संख्या कमी होत जात असून मराठी शाळा ओस पडत असताना रशियन परदेशी पर्यटक कोकणातील मराठी शाळांकडे वळताहेत . रशियाचा मिरॉन लुका सिव्हीज हा मुलगा अकरा वर्षाचा असून तो इयत्ता चौथी शिकत आहे . त्याचे रशियन आई-वडील भारत देश भ्रमंतीसाठी गेल्या चार महिन्यापासून आले आहेत, भारत भ्रमंतीसाठी त्यांनी महाराष्ट्र निवडला असून त्यात गोवा कोकण आणि विशेष करून सावंतवाडी वेंगुर्ले या भागाची त्यांनी निवड केली आहे. रशियामध्ये रशियन भाषेत इयत्ता चौथी मध्ये शिकणारा हा विद्यार्थी व त्याचे आई-वडील मळेवाड येथे भाड्याच्या खोलीत राहतात . डिसेंबर ते मे पर्यंत आपल्या मुलाला शिक्षणापासून वंचित कसे ठेवायचे म्हणून त्यांनी आजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्याला मराठी मातृभाषेतून शिक्षण यावे यासाठी त्याला शाळेत घातले आहे . तो मराठी भाषेतून शिक्षण घेत असून उत्कृष्ट चित्रकार आहे . शाळेच्या मुख्याध्यापिका ममता मोहन जाधव, वर्ग शिक्षिका वर्षा गवस रूपाली नाईक, दत्ता गुरु कांबळी लिंगोजी कोकितकर हे शिक्षक त्याला मराठीचे धडे देत आहेत डिसेंबर पासून आता तो जानेवारीपर्यंत गेल्या तीन महिन्यात तो मराठी मुलांमध्ये रमून गेला आहे, आजगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रशियाच्या मुलाला भावली आहे . विशेष म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील मराठी शाळेमध्ये परदेशी पर्यटक रशियामधील दांपत्य आपल्या मुलाला मराठी शाळेत घालून एक नवा आदर्श आखून दिला आहे त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र सरकारच्या शालेय विभागाची मातृभाषेतून शिक्षण हे सक्तीचे करण्याच्या धोरणाला या रशियाच्या मुलाचा शाळेतील प्रवेश निश्चितच प्रेरणादायी ठरेल . मराठी भाषेबद्दल निर्माण झालेली आपुलकीच त्यांना या शाळेपर्यंत घेऊन आली. मिरॉन भारत- रशिया घट्ट मैत्रीची प्रचिती छोटा दूत बनून देतो आहे .
सावंतवाडी / प्रतिनिधी









