फोंडा पोलिसांची धडक कारवाई : 1 व्यावसायिक, 3 भंगारअ•sवाल्यासह 4 सेक्युरिटी गार्डांना अटक
फोंडा : कुंडई औद्योगिक वासहत परिसरातील आस्थापनाच्या व्हेअरर्हाऊसमध्ये झालेल्या रू. 16 लाखांच्या ऐवजाच्या धाडसी चोरीप्रकरणी फोंडा पोलिसांनी आठ संशयिताना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 8 जणांमध्ये एक मोठा व्यवसायिक, 4 सेक्युरिटी गार्ड, भोम येथील 3 भंगार अ•sवाल्याचा समावेश असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलीस राजकीय पुढाऱ्याच्या वरदहस्तामुळे फोफावलेले स्क्रॅप अ•याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फोंडा पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आठ संशयितामध्ये व्यवसायिक प्रवीण मुंगीलाल जैसनसारीया (35, रा. वारखंडे-फोंडा, मूळ राजस्थान) सुजीत गोएला (26),पप्पू गोएला (22), सुमतलाल गोएला (28), मनोज गोएला (26) या सुरक्षारक्षकांना सर्व राहणारे कुंडई येथील असून मूळ आसाम येथील आहे. सलमान खान (23), सबीर खान (34), फैजल खान (29) या भोमा येथील भंगारअ•sवाल्याचा समावेश आहे.
सुरक्षारक्षक बनले हमाल, व्dयावसायिक निघाला कंपनीचा पुर्वकामगार
चोरीची घटना दि. सोमवार 23 जाने. रोजी उघडकीस आली होती. कुंडई येथील कंपनीच्या व्हेंअरहाऊसमधून सुमारे 15.70 लाख रूपये किमतीच्या 501 पिशव्यानी भरलेला प्लास्टीकचा कच्चा मालाची चोरी शनिवारच्या मध्यरात्री 7 जणांनी मिळून केली होती. भोम येथील तीन भंगारअ•sवाल्यांनी केलेल्या कृत्यात चारही सुरक्षारक्षकानी हमालाची भूमिका बजावली होती. रविवारी कंपनीला सुट्टी असल्याने हा प्रकार कोणाच्या निदर्शनास आला नव्हता. सोमवारी सकाळी कंपनी उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. चोरट्यांनी चोरीचा माल एका कच्चा माल पुरविणाऱ्या प्रविण नामक व्यवसायिकाला विकण्यात आला होता. कुठलीही पडताळणी न करता त्या व्यवसायिकांने चोरीचा माल घेतल्याने तोही या सापळ्यात अडकला. तपासाअंती तो व्यवसायिकही त्याच कंपनीच्या बंगळूर येथील शाखेत काही वर्षापुर्वी कामगार म्हणून काम करीत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कच्चा मालाच्या वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले वाहनाच्या शोधात पोलीस असून संशयिताकडून सद्यपरिस्थित 2 लाख रूपये किमतीच्या ऐवज जप्त करण्यात आला आहे. सर्व संशयिताविरोधात भां.दं.सं. 454, 457, 380 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यता आली आहे. फेंड्याचे पोलीस उपअधिक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयकुमार चोडणकर, उपनिरीक्षक सुरज काणकोणकर, हवालदार केदारनाथ जल्मी, सुरज गावडे यांनी ही कारवाई केली.









