In Satose, role models, retired women were given the honor of hoisting the flag
सावंतवाडी तालुक्यातील सातोसेत 74व्या प्रजासत्ताक दिनी सरपंच प्रतीक्षा मांजरेकर यांनी स्वतःला मिळालेला ध्वजारोहणचा मान गावातील श्री देवी माऊली शाळा सातोसे नं.1 च्या अंगणवाडी मदतनीस तथा आदर्शमाता पुरस्कार प्राप्त तनुजा तुळशीदास गडेकर यांना दिला. तर ग्रामपंचायत मध्ये सेवानिवृत्त कर्मचारी वैशाली विनायक मेस्त्री यांना मान दिला. सरपंच प्रतीक्षा मांजरेकर यांचा वैचारिक दृष्टिकोन गावाच्या प्रगतीच्या दिशेने असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच आबा धुरी, विद्यमान उपसरपंच रुपेश साळगावकर, मदन सातोसकर, प्रसाद मांजरेकर, संपदा धुरी, अपर्णा पेडणेकर, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच प्रतीक्षा मांजरेकर म्हणाल्या की, गावाच्या सेवेत अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य केले. अशा व्यक्तींना आम्ही ध्वजारोहणाचा मान देत त्यांचा सन्मान केल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच आबा धुरी यांनीही विचार व्यक्त केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी









