Do you know these things about Anand Dighe who is known as ‘Balasaheb Thackeray of Thane’?
शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे सूत्र पक्क करण्यासाठी अगदी तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणारा नेता म्हणून आनंद दिघे यांना ओळखले जातं होते.९० च्या दशकात शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असे जणू समिकरणच तयार झाले होते. ठाणे जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात शिवसेना अगदी मुख्य शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दिघे यांनी केले. त्यांचे पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे असे होते.आनंद दिघेंचा जन्म जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला.ठाण्यातील सर्वात गजबजाटलेला परिसर म्हणून ओळख असणाऱ्या टेंभी नाका परिसरामध्ये त्यांचे घर होते.याच परिसरात असणाऱ्या सेंट्रल मैदान भागांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या.त्यांच्या या सभेला अगदी तरुणपापासून आनंद दिघे या सभांना आवर्जून उपस्थित रहायचे. शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सामान्यांमधून पुढे आलेले आणि आपलेसे वाटणारे नेतृत्व हवे होते . ती गरज आनंद दिघे यांनी पूर्ण केली. .त्यांनी बाळासाहेबांपासून प्रभावित होऊन शिवसेनेसाठी काम करण्याचे ठरवले. ते सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यानंतर मजल दरमजल करत ते ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदापर्यंत पोहचले.अल्पावधीमध्येच आजही शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात दिघे प्रचंड लोकप्रिय झाले.
तरुण भारत ऑनलाइन