The sarpanch of Kavathani village gave the honor of hoisting the flag to a disabled youth!
कवठणी गावचे सरपंच अजित कवठणकर यांनी चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी गुरुवार दि 26 जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा मान गावातील दिव्यांग तरुण शुभम दीपक कवठणकर यांना देऊन एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.यावेळी उपसरपंच सोनम कवठणकर, ग्रामपंचायत सदस्य अजय सावंत, यामेश्वर कवठणकर,अमित कवठणकर,रश्मी कवठणकर, विजया कवठणकर, श्रद्धा कवठणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रजासत्ताक दिनी झेंडा ध्वजारोहणाचा मान बाजूला ठेऊन सरपंच अजित कवठणकर यांनी गावातील दिव्यांग तरुण शुभम दीपक कवठणकर यांना व्हीलचेअरवरून ग्रामपंचायत कार्यालयाच्या ध्वजारोहण स्थळी आणून शुभम कवठणकर यांच्याहस्ते ध्वजारोहण केले. एक चांगला पायंडा सरपंच श्री कवठणकर यांनी घातला आहे.विद्यमान सरपंच अजित कवठणकर यांनी यापूर्वी पाच वर्षें उपसरपंचपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहेत.गावाच्या विकासात त्यांचे चांगले योगदान आहे. कोरोना काळातही त्यांनी गावासाठी भरीव कामगिरी केली होती.
सातार्डा / प्रतिनिधी