प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम
बेळगाव : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कॅम्प येथील आर्मी कमांडर विंग येथे केएलई म्युझिक ऑफ स्कूलतर्फे ‘हिंदुस्थानी शास्त्राrय संगीत व देशभक्तीपर गीतगायनाचा कार्यक्रम’ पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून जनरल आर. एस. गुरय्या (व्हीएसएम), कर्नल मनोज शर्मा व सैन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जनरल आर. एस. गुरय्या यांनी या देशभक्तीपर गीतगायनामुळे आपल्या देशाचा अभिमान अधिक दृढ झाला आहे. लष्करातील अधिकारी देशहितासाठी काम करत असून त्यांना या कार्यक्रमाने प्रेरणा मिळाली, असे सांगितले. यावेळी गायक कलाकारांना संवादिनी आणि किबोर्डची साथ यादवेंद्र पुजारी, तबल्याची साथ राहुल मंडोळकर, ऑक्टोपॅड साथ श्रीवत्स हुद्दार यांनी केली. स्वाती हुद्दार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेच्या प्रा. डॉ. सुमिता पाटील, डॉ. दुर्गा नाडकर्णी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनलाभले.









