ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री श्री रविशंकर एका खासगी हेलिकॉप्टरने बेंगळूरहून तिरूपतीला निघाले होते. सकाळी 10.15 मिनिटांनी त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. खराब हवामानामुळे रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे तामिळनाडूच्या इरोडमधील सत्यमंगलम येथे 10.40 वाजता इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये रविशंकर यांच्यासोबत त्यांचे दोन सहाय्यक आणि पायलट होता. हे सर्वजण सुरक्षित असून, हवामान सुधारल्यानंतर 50 मिनिटांनी हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येते.
अधिक वाचा : आ. संतोष बांगर यांची प्राचार्यांना मारहाण








