We will protest if wrongly admitting students from neighboring districts in Navodaya Vidyalaya!
दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांचा इशारा
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे तसेच चुकीच्या पद्धतीने पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांनी दिला आहे.
मागील काही वर्षांमध्ये चुकीच्या पद्धतीने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे.याबद्दल शिवसेनेच्या वतीने आवाज उठवलेला आहे तसेच पुन्हा या चुकीच्या पद्धतीने प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रवेशापासून
वंचित राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संजय गवस यांनी दिला आहे. सन 2023 2024 जवाहर नवोदय विद्यालय सांगेली सिंधुदुर्ग महाराष्ट्र इयत्ता सहावी साठी ऑनलाईन अर्ज भरणे प्रक्रिया सुरू असून अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 तर परीक्षा तारीख 29 एप्रिल 2023 अशी आहे तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करावा असे आवाहन आहे संजय गवस यांनी केले आहे.तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मिळावा यासाठी शिक्षणविभागाने जास्तीतजास्त प्रयत्न करावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.
साटेली /भेडशी प्रतिनिधी









