कोट्यावधी ऊपयांच्या घोटाळ्याचा आरोप : चार संगणकांचे हार्ड डिस्क जप्त, तपासाला गती
प्रतिनिधी /मडगाव
कट कारस्थान रचून, कागदपत्रात फेरफार कऊन कित्येक कोटींना गंडा घातल्याचा आरोप असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या मडगाव कार्यालयावर मंगळवारी छापा मारण्यात आला. या कार्यालयातील 4 संगणकाचे हार्ड डिस्क जप्त करण्यात आले आहेत. मडगाव शाखेचे विभागीय व्यवस्थापक हेमंत सूर्यवंशी व इतर दोन संशयित आरोपींविऊद्ध या प्रकरणासंबंधी फातोर्डा पोलीस स्थानकात यापूर्वीच गुन्हा नोंद झालेला आहे.
भारतीय दंड संहितेच्या 465, 468, 471, 120-ब कलमाखाली या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फ्लॅट वा इतर प्रॉपर्टीच्या ‘व्हॅल्युएशन’ अहवालात फेरफार केल्याचा या प्रकरणातील संशयिताविऊद्ध आरोप आहे.
संगणकांचे हार्ड डिस्क जप्त
मंगळवारी 24 जानेवारी रोजी राज्य सरकारच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या कार्यालयावर छापा टाकला. दुपारी 1 ते 3.30 पर्यंत हे छापासत्र चालू होते. या छाप्यात संवेदनशील माहिती असलेल्या चार संगणकांचे हार्ड डिस्क तपास यंत्रणेने पंचनामा कऊन जप्त केले.
रितसर पोलीस तक्रार
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचे ‘पॅनेल व्हॅल्युएर’ तसेच जोजेफ किरांचिरा यांनी या एकंदर प्रकरणासंबंधी फातोर्डा पोलीस स्थानकात रितसर तक्रार केलेली आहे. मनोजकुमार कोडापुल्ली आणि एम. झेव्हीयर हे या प्रकरणातील इतर दोघे संशयित असल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित होत नसल्याचे कंपनीच्या लक्षात आले तेव्हा फ्लॅटच्या ‘व्हॅल्युएशन’मध्ये गडबड केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली.
रिकव्हरी अधिकाऱ्यामुळे घोटाळा उघडकीस
प्राप्त माहितीनुसार संशयित कोडापुल्ली याने या कंपनीकडून दोन कर्जे घेतली तर एम. झेव्हीयर यांनी एक कर्ज घेतले. मात्र, या कर्जाची परतफेड होईना तेव्हा रिकव्हरी अधिकाऱ्याने केलेल्या प्राथमिक चौकशीत हा घोटाळा उघडकीस आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर व्हॅल्युअरने हा प्रकार कंपनीच्या मुख्यालयाच्या निदर्शनाला आणून दिला. ही घटना प्रत्यक्षात मार्च 2020 मध्ये घडली होती. मात्र पोलीस तक्रार हल्लीच करण्यात आली.
या घोटाळ्यासंदर्भांत स्थानिक पातळीवर किंवा मुख्यालयाकडून सखोल चौकशी होत नसल्याचे पाहून व्हॅल्युअरने या प्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार केली.
बनावट सही केल्याचा आरोप
या प्रकरणातील काही संशयित आरोपींनी व्हॅल्युअरची बनावट सही मारली आणि बनावट रब्बर शिक्का माऊन अहवाल तयार केल्याचा आरोप आहे आणि हा अहवाल खरा असल्याचे भासवून एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीला सादर केला. या (बनावट) अहवालानुसार कोडापुल्ली आणि झेव्हीयर यांना एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीने मोठ्या रकमेची कर्जे वितरित केली होती असा आरोप पोलीस तक्रारीत आहे.








