प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील सुप्रसिध्द अभिनेते अजित केरकर यांना कोंकणी नाटकातील दीर्घकालीन योगदानासाठी प्रतिष्ठेचा मंगळूरच्या विश्व कोंकणी केंद्राचा डॉ पी दयानंद पै विश्व कोंकणी रंगश्रेष्ठ पुरस्कार 2022 घोषित झाला आहे. एक लाख रूपये व मानचिन्ह अशा स्वरूपातील हा पुरस्कार त्यांना 9 फेब्रुवारी येथे मंगळूरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. अजित केरकर यांनी कोंकणी रंगमंचाला आपली रंगसंपन्न प्रतिभा व सृजन उन्मेष याद्वारे मागील पाच दशके बहुमुल्य योगदान दिले आहे. अ??क प्रथम बक्षिसे त्यांनी स्पर्धेत प्राप्त केली आहेत. नेपथ्य व दिग्दर्शनातही बक्षिसे मिळवली आहेत. त्यानी सतत चारदा प्रथम बक्षिस मिळवण्याचा विक्रम करताना एकंदर सातदा अभिनयाचं प्रथम बक्षिस प्राप्त केलं आहे. दोरेमिफा, तुळाभार, एवम इंद्रजीत, चैतन्याक मठ ना, पिपळ पेटला व इतर अ??क नाटकातील त्यांच्या भूमिका यादगार ठरल्या आहेत.
या पुरस्काराच्या निवड समितीचे परीक्षक परीक्षक म्हणून डॉ जी जी लक्ष्मण, संजीव वेरेकर, मुरलीधर शेणॉय, जॉन पेरमानूर यांनी काम पाहिले. दरम्यान कोंकणी साहित्याचे इंग्रजीत अनुवाद केल्ल्याबध्दल विद्या पै यांना एक लाख रूपयांचा डॉ पी दयानंद पै विश्व कोंकणी अ??वाद पुरस्कार 2022 घोषित झाला आहे. विद्या पै यांनी अ??क कोंकणी कथा व कांदबऱ्या इंग्रजीत अनुवादीत केल्या आहेत. विद्या पै यांचं हे अ??वादाचं कार्य विपुल व उदंड आहे. या अ??वाद पुरस्काराचे परीक्षक म्हणून पय्यनूर रमेश पै, गोकुळदास प्रभू, डॉ किरण बुडकुले व मेलवीन रॉड्रीग्स यांनी काम पाहिले.









