कोल्हापूर प्रतिनिधी
पूर्वी क्रांतिकारकांनी क्रांती करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आता या आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी या सर्व लोकप्रतिनिधींनी कार्यरत राहत आपल्या परिसराचा विकास करण्याचे ठरवल्यास देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. आणि हीच खरी देशसेवा ठरते, असे प्रतिपादन थायलंडचे अर्थ मंत्रालयाचे सल्लागार, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी केले.
हुतात्मा सामाजिक क्रांती संघटनेच्या वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 126 व्या जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मिरजकर तिकटी येथील हुतात्मा स्तभाजवळ नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला डॉ. चेतन नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर उपअभियंता नारायण भोसले, कनि÷ अभियंता महानंदा सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी रसिका अमर पाटील, पल्लवी पाटील, सुमन गुरव, संगीता पाटील, अनिष जयसिंगराव पाटील, रोहित रघुनाथ पाटील यांच्यासह पाचलोक नियुक्त महिला सरपंच आणि पाच लोकनियुक्त पुरूष सरपंचांना सन्मानचिन्ह गुलाब पुष्प आणि कोल्हापुरी फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक किसनराव कल्याणकर यांनी केले. अध्यक्ष दुर्वास कदम यांनी कार्यक्रमांची माहिती दिली. संभाजीराव जगदाळे यांचा कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिवाजी ढवाण, बापू साळुंखे, लक्ष्मण मोहिते, सुनील हंकारे, डॉक्टर गुरुदत्त म्हाडगुत, अनिल कोळेकर, किशोर यादव, जयकुमार शिंदे, अर्जुन शिंदे, किरण भोसले यांच्याबरोबर परिसरातील असंख्य व्यापारी नागरिक मोठय़ संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रामेश्वर पतकी यांनी केले.









