सातारा -प्रतिनिधी
साताऱ्यातील राधिका रोड वरील गाडी खरेदी विक्री करणाऱ्या सातारा मोटर्सचे मालक अमीत आबासाहेब भोसले यांची वाढे फाट्याजवळ हॉटेल भाऊसाहेब स्नॅक्स सेंटर समोर रात्री१२ च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करुन हत्या केली.याच हॉटेल मध्ये जेवण करून बेसिन वर हात धुत असताना लाईट बंद करून जवळून चेहऱ्यावर गोळीबार केला. त्यावेळी अमीत भोसले हा जमीनीवर पडल्यानंतर चेहरा दगडांनी ठेचून हल्लेखोर पसार झाले.याची माहिती मिळताच तालुका आणि शाहुपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यात अमीत आबासाहेब भोसले (वय- ४०) शुक्रवार पेठ, (कोटेश्वर मंदिराच्या मागे)याचा जागेवर मृत्यू झाला. घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सह तालुका आणि शाहुपुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.अमीत भोसले यांच्या मारेकऱ्यांचा पोलिसांनी तत्काळ शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. सदरच्या हॉटेल मालक, अन्य मित्रांकडून पोलिसांनी माहिती घेत तपास सुरू केला आहे.









