कॉन्ट्रॅक्टर बेपत्ता असल्याचे उघड
प्रतिनिधी /वाळपई
वाळपई नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे आव्हान नगरपालिका मंडळासमोर आहे. असे असताना वाळपई नगरपालिकेच्या भाडोत्री तत्त्वावर थेटर चालविण्राया कॉन्टॅक्टरने नगरपालिकेला 87 लाख ऊपयांचा गंडा घातलेला आहे.
भाड्याची रक्कम न भरता सदर कॉन्ट्रॅक्टर बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे हा विषय नागरिकांसाठी चर्चेचा ठरलेला आहे. नगरपालिकेने सदर कॉन्ट्रॅक्टरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा शोध अजून पर्यंत लागलेला नाही. यामुळे 87 लाखांना वाळपई नगरपालिकेला फटका बसल्याचे समोर आलेले आहे.
कोट्यावधी खर्च करून वाळपई नगरपालिकेने थेटरची निर्मिती केली होती. नगरपालिकेच्या कार्यालया समोर असलेल्या इमारतीच्या दुस्रया मजल्यावर या थेटरचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. वाळपई भागांमध्ये सिनेमा थिएटरची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकाकडून या संदर्भात वारंवारपणे मागणी करण्यात येत होती. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पुढाकार घेऊन थेटरची संकल्पना निर्माण केल्यामुळे सिनेमाप्रेमीमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला होता. सदर थिएटर चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिल्ली येथील एका इसमाला दिले होते. जवळपास आठ महिने सदर थेटर सुरू होते. मात्र कोविड काळात सदर थेटर बंद झाले. कोविड संपल्यानंतर हे थेटर सुरू होणार असे सिनेमाप्रेमींची अपेक्षा होती. मात्र बंद झालेले थेटर गेल्या दोन वर्षापासून सुरू झालेले नाही.
सुमारे एक वर्षभर सदर थिएटर सुरू होते. यासाठी वाळपई नगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टरने भाडे भरणे गरजेचे होते. मात्र सदर भाडे न भरताच सध्यातरी हा कॉन्ट्रॅक्टर बेपत्ता झाल्याची बाब समोर आलेली आहे. जवळपास दोन वर्षापासून नगरपालिका सदर कॉन्ट्रॅक्टरचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे .अनेकवेळा नगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टरने लेखी स्वरूपात दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला .ईमेलद्वारे त्याला या संदर्भाची थकबाकी वसुलीची नोटीस बजाविण्यात आली. मात्र सदर कॉन्ट्रॅक्टरचा अजूनही पत्ता सापडलेला नाही. पाठविण्यात आलेल्या अनेक नोटीसा परत येऊ लागलेल्या आहेत. यामुळे सध्यातरी वाळपई नगरपालिकेची डोकेदुखी वाढलेली आहे. सुमारे 87 लाख ऊपयांची थकबाकी कॉन्ट्रॅक्टरने वाळपई नगरपालिकेला भरणे गरजेचे आहे. मात्र कॉन्ट्रॅक्टरचा पत्ता लागत नसल्यामुळे नगरपालिकेसमोर डोकेदुखी वाढलेली आहे.
सदर थिएटरची किरकोळ दुऊस्ती हाती घेणे गरजेचे आहे. ही दुऊस्ती घेतल्यास सदर थेटर कार्यक्रमांसाठी भाडोत्री तत्त्वावर उपलब्ध होऊ शकते. यातून नगरपालिकेला महसूल उपलब्ध होऊ शकतो.
नगराध्यक्ष सेहझीन शेख यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की अनेकवेळा सदर कॉन्ट्रॅक्टरच्या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्यांनी कागदपत्रांमध्ये दिलेल्या पत्त्यावरून पाठविण्यात आलेली पत्रे माघारी येत आहेत. ई-मेल द्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. यामुळे नगरपालिकेची मोठी रक्कम सध्यातरी थकल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तरीसुद्धा सदर कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न नगरपालिका विविध स्तरावरून करीत असल्याचे नगराध्यक्षांनी पुढे बोलताना सांगितले.









