पोटविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना लाभ
प्रतिनिधी /बेळगाव
आजच्या आधुनिक युगात माणूस कामात गुरफटत चालला आहे. पण हे करत असताना पोटाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पोटातील संसर्ग बळवले असून पोटविकार रुग्णही वाढले आहेत. आता बेळगाव शहरातील नामांकित अरिहंत हॉस्पिटलमध्ये 24 तास गॅस्ट्रो विभाग सुरू करण्यात आला असून पोटविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना याचा लाभ होणार आहे. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट व सर्जन डॉ. सुहास कलघटगी व गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉ. सुजित रेड्डी हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरिहंत हॉस्पिटलवतीने करण्यात आले आहे. अरिहंत हॉस्पिटल प्रत्येक रुग्णाला अत्याधुनिक सुविधा देण्यात अग्रेसर राहिले आहे. आता गॅस्ट्रो विभागही सुरू झाला आहे. या अंतर्गत एंडोस्कोपी, लिव्हर सर्जरी, रेडिओलॉजी, एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, लिव्हर ट्रान्सप्लांट, हेपेटायटीस-बी आदींवर उपचार करण्यात येणार आहेत.
हुबळी येथील इन्स्टिट्यूट अँड गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी (आयएलजी) संस्थेचे डॉ. सुहास कलघटगी, डॉ. सुजित रेड्डी व इतर डॉक्टरांचे पथक अरिहंत हॉस्पिटलमध्ये पोटविकार रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. तपासणी व उपचार एकाच छाताखाली होणार असून अरिहंत हॉस्पिटल रुग्णांना सेवा पुरविण्यास तत्पर आहे.









