केएसआरटीसीचे अॅप कार्यान्वित : प्रवाशांना सोयीस्कर : परिवहनकडून जनजागृती
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनने प्रवाशांच्या सोयीखातर ऑनलाईन अॅप कार्यान्वित केला आहे. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करणे सोयीस्कर झाले आहे. विशेषत: घरबसल्या मोबाईलवरून तिकीट बुकिंग केले जात आहे. त्यामुळे अलीकडे
ऑनलाईन तिकीट बुकिंग वाढले आहे. कोरोना काळापासून ही ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्था परिवहनने सुरू केली आहे. त्याला प्रतिसाद वाढला आहे. कोरोना काळात धोका टाळण्यासाठी तिकीट आरक्षित करण्यासाठी केएसआरटीसी नावाने अॅपची निर्मिती केली होती. मात्र, कोरोना काळात बहुतांश दिवस बससेवा ठप्प होती. त्यानंतर आता सुरू झालेल्या सुरळीत बससेवेत या अॅपचा वापर वाढला आहे. या
अॅपद्वारे ऑनलाईन तिकीट बुकिंग केले जात आहे. याबरोबरच परिवहनने क्srtम्.gदन्.ग्ह ही वेबसाईटदेखील ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध केली आहे.
कोरोना काळात तिकीट काऊंटरवर होणारी गर्दी टाळण्यासाठी परिवहनने ही व्यवस्था केली होती. त्याला प्रतिसाद वाढला आहे. दरम्यान निपाणी, चिकोडी, बैलहोंगल, हुक्केरी, बळ्ळारी, बेंगळूर, म्हैसूर, पुणे, तिरुपती आदी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी हा अॅप सोयीस्कर ठरत आहे. याबाबत परिवहनकडून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे प्रवासी या अॅपद्वारे ऑनलाईन तिकीट बुकिंग करू लागले आहेत.
प्ले स्टोअरमधून अॅप डाऊनलोड केल्यानंतर आवश्यक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर लॉग इन करावे लागेल. त्यामध्ये प्रवाशांना कोठे जायचे आहे? कोणत्या गाडीने जायचे आहे? कोणत्या ठिकाणी बसमध्ये चढायचे आहे? कोणत्या ठिकाणी उतरायचे आहे? यासह आसन क्रमांक, बसची वेळ, त्यांच्या सोयीनुसार निवडण्याची सुविधा या अॅपमध्ये आहे. याबरोबर ऑनलाईन पैसे अदा करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या बसचे तिकीट बूक करणे शक्य झाले आहे.
विशेषत: घरी बसून पुणे, मुंबई, बेंगळूर, नाशिक या शहरांकडे जाणाऱ्या बसचेदेखील तिकीट बूक करता येत आहे. त्यामुळे सणासुदीच्या वेळेत आणि सिझनच्या काळात प्रवाशांना आपल्या मोबाईलमध्ये बसचे बुकिंग करता येत आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात जाण्याचा त्रास वाचणार आहे.
प्रवाशांच्या सोयीखातर …
प्रवाशांच्या सोयीखातर केएसआरटीसीने अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवासी बसतिकीट बुकिंग करू शकतात. त्यामुळे बसस्थानकात येण्याची गरज नाही. घरबसल्या प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येत आहे. याला प्रवाशांची पसंती वाढली आहे.
– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रणाधिकारी)









