बेळगाव : संयुक्त महाराष्ट्र चौक येथील कल्याणी स्वीटमार्टवरील हॉटेलला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. वेळेत हा प्रकार लक्षात आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
रविवारी सकाळी 6 वाजता हॉटेलमधून धूर येताना दिसून आला. त्यामुळे रखवालदाराने तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. थोड्या वेळात बंब दाखल झाला. आगीचा भडका उडण्याआधीच आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे अनर्थ टळला.









