वार्ताहर/ पणजी
माऊतीगड-मळा येथील श्री माऊतीराय संस्थानचा 92 वा जत्रोत्सव सोमवार दि. 30 जानेवारी ते गुऊवार दि. 2 फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल.
श्री माऊतीराय संस्थान, माऊतीगड येथील जत्रोत्सव तिसवाडी तालुक्यातील सर्वांत मोठा जत्रोत्सव म्हणून गणला जातो. सोमवार 30 रोजी सकाळी श्रींस अभिषेक, पहाटे 5 वा. मुख्य धार्मिक विधींना सुऊवात होईल. दुपारी 12.30 वा. पुर्णाहुती, आशीर्वाद, महाआरत्या व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी 7 वा. श्री माऊतीरायाची पालखीतून भव्य मिरवणूक मळा येथील श्री पांडुरंगाच्या देवालयातून पिपल्स हायस्कूल जवळील श्री चिंचेश्वराला वळसा घालून मानसभाटपर्यंत जाऊन परत मंगळवारी पहाटे माऊतीगडावरील श्रींच्या मंदिरात येणार आहे. यावेळी पालखीतील श्री माऊतीरायाचे घरोघरी बँडवादनासह स्वागत होऊन श्रींची आरती व भाविकांकडून पूजा-अर्चा करण्यात येईल.
मंगळवार 31 रोजी रात्री 10.30 वा. मंदिराच्या परिसरात श्रींची पालखी मिरवणूक, आरती, प्रसाद व पावणी तदनंतर अभिनय पणजी प्रस्तुत शेखर उसगावकर दिग्दर्शित ‘अॅक्युली … हांव तुजेच’ हे कोकणी नाटक होईल. बुधवार 1 रोजी रात्री 10.30 वा. पालखी मिरवणूक, आरती, प्रसाद व पावणी. नंतर सीतामाई तिसवाई दैवज्ञ महिला मंडळ प्रस्तुत विनोदी कोकणी नाटक ‘कुंडलिका नायट्स’ हे आशिष नागवेकर लिखित व दिग्दर्शित नाटक होईल.
गुऊवार 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वा. श्रींची पालखी मिरवणूक, आरती, प्रसाद व पावणीनंतर आदिमाया क्रिएशन पणजी प्रस्तुत प्रदीप रायकर दिग्दर्शित ‘संगीत वस्त्रहरण’ हे मालवणी नाटक होईल. मंगळवार 31 जानेवारी ते गुऊवार 2 फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी 7 वा. मळा झरीजवळील खास व्यासपीठावर फुल-फळफळावळांची पावणी होईल. तद्नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होईल.









