प्रतिनिधी/ बेळगाव
नेताजी युवा संघटना संचालित नेताजी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सोमवार दि. 23 रोजी करण्यात येणार आहे. कारभार गल्ली, वडगाव येथे ही इमारत उभारण्यात आली असून नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचे औचित्य साधून सायंकाळी 6 वा. उद्घाटन होणार आहे.
वडगाव परिसरात या सोसायटीने आपले नावलौकिक कायम ठेवला आहे. अल्पावधीतच या परिसरात ही संस्था नावारुपाला आली आहे. पूर्वी भाडोत्री इमारतीमध्ये शाखेचे कामकाज सुरू होते. आता नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. या उद्घाटनप्रसंगी सभासद, भागधारक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील, व्हा. चेअरमन आर. एम. मुरकुटे व संचालक मंडळाने केले आहे.









