ट्रान्सजेंडर महिलेने शिंगांना केले प्रत्यारोपित
एका ट्रान्सजेंडर महिलेने ड्रगनप्रमाणे दिसण्यासाठी स्वतःच्या शरीरात इतके बदल करविले आहेत, की आता तिला ओळखणे देखील अवघड आहे. तिने स्वतःचे कानही काढले असून नाकाच्या वरील हिस्सा हटविला आहे. या ट्रान्सजेंडर महिलेची छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या ट्रान्सजेंडर महिलेचे नाव तियामत इवा मेडुसा असून ती अमेरिकेच्या ऍरिझोनात राहते. तिचे मूळ नाव रिचर्ड हर्नांडेज होते आणि तिने बँकर म्हणूनही काम केले आहे. पंरतु आता ती ‘ड्रगन’प्रमाणे दिसते.

तिने स्वतःच्या डोळय़ांचा रंग हिरवा करवून घेतला आहे. तर डोयावर शिंगांना प्रत्यारोपित करविले आहे. तिचे पूर्ण शरीर टॅटूंनी झाकोळले गेले आहे. तसेच तिने स्वतःचे दात प्राण्यांसारखे करविले आहेत. एवढेच नाही तर तियामतने टोकदार जीभ प्राप्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करविली असून याकरता हजारो पाउंड खर्च केले आहेत.
तियामत स्वतःची छायाचित्र इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिला सुमारे 25 हजार जण फॉलो करतात. इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये तिने स्वतःला फॅशन मॉडेल संबोधिले आहे. एका पौराणिक सरीसृप प्राण्यात (टीटामॅट) रुपांतरित होण्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेला पूर्ण करण्यासाठी तिने बॉडी मॉडिफिकेशन करविले आहे.
तियामतने एक ट्रान्सजेंडर म्हणून भेदभाव, गैरवर्तन आणि लैंगिक हिंसेला तोंड दिले आहे. याचमुळे तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती आता स्वतःला ड्रगन किंवा रेप्टोइड म्हणवून घेते. स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर तिने अलिकडेच 1990 पासून 2016 पर्यंत शरीरात झालेल्या बदलांची छायाचित्रे शेअर केली आहेत.









