सियाम संघटनेची माहिती ः आजवरची विक्रमी नोंद
नोएडा
नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्सपो 2023 प्रदर्शनाला जवळपास 6 लाखाहून अधिक जणांनी भेट दिल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) यांनी दिली दिली आहे. सदरच्या प्रदर्शनाला भेट देणाऱयांची संख्या यंदा विक्रमी नोंदवली गेली असल्याचे सियाम संघटनेने म्हटले आहे.

सदरचे प्रदर्शन 2022 मध्ये आयोजीत होणार होते, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते पुढे ढकलण्यात आले होते. त्यानुसार अलीकडेच हे प्रदर्शन नोएडात उत्साहात पार पडले. 75 उत्पादने एकंदर प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. 11 ते 18 जानेवारी या काळात प्रदर्शनाचं आयोजन होतं ज्यात सामान्यांसाठी प्रदर्शनात 13 जानेवारीपासून प्रवेश होता. जागतिक स्तरावर सुझुकी मोटर कॉर्पोरेशन कंपनीची नवी सुव्ह प्रकारातील इव्हीएक्स ही गाडी प्रदर्शनात सादर करण्यात आली, जी 2025 मध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. वरीलप्रमाणे 6 लाखाहून अधिक भेटकर्त्यांची संख्या ही आजवरची विक्रमी असल्याचे सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी म्हटले आहे. 2020 नंतर कोरोनाच्या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात आलेले नव्हते. यंदा कोरोनाचे सावट पूर्णतः हटल्याने प्रदर्शनाला लक्षणीय गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.









