कागल पोलिसांची कारवाई
कागल / प्रतिनिधी
कागल पोलिसांनी मोटसायकली चोरी प्रकरणी शहरातील दोघा तरुणांनाअटक केलीय.त्यांच्याकडून चोरीच्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली जप्त केल्या आहेत. पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली.
कागल शहरातील अजय विश्वास कोरवी आणि मनिष प्रताप कांबळे हे चोरीच्या यामाहा मोटरसायकलतीचे स्पेअर पार्ट बदलण्यासाठी दुचाकी मेकॅनिककडे गेल्यानंतर मोटरसायकल चोरीची घटना उघडकीस आली. पोलिसांनी अजय कोरवी आणि मनिष कांबळे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता कागल शहरातून पाच मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली जप्त केल्याची माहिती, करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी दिली. जप्त केलेल्या यामाहा कंपनीच्या चार आणि हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटरसायकलीचा समावेश आहे. या मोटरसायकलींची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. यावेळी पोलिस निरिक्षक चंद्रकांत निरावडे ,सहाय्यक पोलिस निरिक्षक दिपक वाकचौरे, उपनिरीक्षक रविकांत गच्चे, पोलिस नाईक विजय पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.