The famous bull with a fifth on its back in Karivade
ओटवणे येथे गेले आठ दिवस वास्तव्यास असलेल्या पाच पायांच्या बहुचर्चित बैलाने गुरुवारी सकाळी कारीवडे गावात एन्ट्री करत सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी पाठीवर पाचवा पाय असलेल्या या बैलाच्या चारा व पाण्याची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर तसेच रवी परब व इतर ग्रामस्थांनी केली.
गेले आठ दिवस ओटवणेवासियांनीही या बैलाचा पाहुणचार केला होता. या बैलाच्या पाठीवर व्यंग असलेला पाचवा पाय असल्यामुळे तो चर्चेत होता. कारीवडे गावात या बैलाने प्रवेश केल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली. सध्या या बैलाला संजय जाधव यांच्या घरी बांधून ठेवण्यात आलेला आहे. त्याच्या चारा पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. हा बैल कोणाचा असेल तर त्यांनी
8668780645 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.
ओटवणे प्रतिनिधी