प्रतिनिधी,सेनापती कापशी
Hasan Mushrif : नामांकित अशा गोकुळ दूध संघाचे विशेष चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचे मला आश्चर्य वाटते. पण या निर्णयाचे आपण स्वागतच करीत आहे. मात्र यामुळे गोकुळचा कसा स्वच्छ आणि पारदर्शी कारभार सुरू आहे, हेही समोर येईल असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
गोकुळ दूध संघाचे लेखापरीक्षण होणार आहे, याबाबत आमदार मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, ‘या निर्णयाचे आपण स्वागत करीत आहे. कारण लेखापरीक्षण तपासणीनंतर गोकुळचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक किती आहे, हे स्पष्ट होऊन जनतेसमोर येईल.
आमदार मुश्रीफ कोणाचेही नाव न घेता म्हणाले, कोणाच्यातरी तक्रारीवरून शासन गोकुळची लेखापरीक्षण तपासणी करीत आहे. याचे मला आश्चर्य वाटत आहे.
गोकुळच्या निवडणुकीत दोन रुपये दूध उत्पादकांना दरवाढ देऊ आणि चांगला स्वच्छ, पारदर्शी कारभार करू अशी ग्वाही दिली होती. दोन रुपयेच काय? आठ रुपये दर दुध वाढ दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या दूध संघात यापूर्वी उपपदार्थाच्या निर्मितीतून कोणताही फायदा होत नव्हता. मात्र या दीड वर्षाच्या कालावधीत उपपदार्थातून चांगला फायदा होत आहे.
आमचा सर्व कारभार कायदेशीरपणे सुरू आहे. शिवाय आमच्या सोबत ‘गोकुळ’च्या सत्तेत सध्या भाजपसोबत असलेले विनय कोरे, शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके हेही आहेत. असे असताना देखील दूध संघाचे विशेष लेखापरीक्षण होत आहे? याचेच मला आश्चर्य वाटत असल्याचेही ते म्हणाले. या लेखापरीक्षण तपासणीबाबतचा प्रश्न गोकुळच्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांना विचारला तर बरं होईल, असेही आमदार मुश्रीफ म्हणाले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









