प्रतिनिधी /मडगाव
एस्टेलर अकादमी, जी विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षित करण्यासाठी ओळखली जाते, ती नीट आणि जेईई 2022 मधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. एस्टेलर अकादमीच्या च्या विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई 2022 परीक्षेत कमालीची चांगली कामगिरी केली. ज्याने 55 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांत जागा मिळाल्या.
या बॅचमधील साक्षी हंगरगेकर हिला 656 गुण मिळाले तर अमन मौर्य आणि विधी पाणंदीकर यांनी अनुक्रमे 619 आणि 605 गुण मिळाले. दरम्यानच्या काळात त्यांच्या अभियांत्रिकी बॅचने जेईई 2022 च्या परीक्षेतही उत्कृष्ट कामगिरी केली असून सिद्धांत सिंगने 99.73 टक्के गुण प्राप्त केले आणिइतर अनेकांनी 99 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवले.
मागील वषी म्हणजे नीट 2021 आणि जेईई 2021च्या परीक्षांमध्ये देखील एस्टेलर अकादमीच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली होती. अभिदा बार्रेटो (गोवा नीट स्टेट टॉपर 2021) हिने 680 गुण मिळवले आणि एएफएमसी मध्ये जागा मिळवून एस्टेलरची 2022 टॉपर साक्षी हंगरेकर यांच्यानंतर एएफएमसा पुणे मध्ये जागा मिळविली.
विद्यार्थ्यांच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल 15 जानेवारी 2023 रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. नीट आणि जेईई मध्ये सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल आणि राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवल्याबद्दल 100 हून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जेईई आणि नीटच्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, माजी शिक्षण संचालक श्री. डी. आर. भगत, मराठा शिक्षण संस्कृती मंडळाचे अध्यक्ष रवळू शेट्यो डॉ. एस. टी. पुट्टाराजू अध्यक्ष-एस्टेलर एज्युकेशनल ट्रस्ट. योगेंद्र सिंग सिकरवार, एस्टेलर अकादमीचे संचालक आणि संस्थापक उपस्थित होते.
एस्टेलर हायर सेकेंडरी स्कूल ऑफ एक्सलन्सचे संचालक व प्राचार्य योगेंद्रसिंग सिकरवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी असे अप्रतिम निकाल दिल्याचा आनंद व्यक्त केला आणि दरवषी असे उत्कृष्ट निकाल दिले जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ते म्हणाले, ही फक्त सुरूवात आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, येणाऱ्या काळात या पेक्षाही चांगली कामागिरी साध्य केली जाईल. विद्यार्थी व शिक्षकांनी घेतलेली मेहनतीचे ही फलश्रुती आहे. आमच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वकाही करू.’ डॉ. एस.टी. पुट्टाराजू यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
आमदार डॉ.चंद्रकांत शेट्यो यांनी तऊण मनांना महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल एस्टेलर अकादमी आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. आता सर्वांनी व्यावहारिक कौशल्याचे ज्ञान सैद्धांतिक रूपांतर करण्यावर भर द्यावा.
शेवटी फैजल शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिसा कार्व्हालो आणि अमांडा परेरा यांनी केले. सिद्धांत सिंग आणि कु. विधी पै पाणंदीकर (विद्यार्थी) यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. एस्टेलर अकादमीबद्दल कृतज्ञता आणि एस्टेलर अकादमीच्या उत्कृष्ट शिक्षकांचे कौतुक केले.
एस्टेलर अकादमीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे पोस्टर अनावरण करण्यात आले. त्यानंतर एस्टेलर अकादमीच्या यशवंतांना ट्रॉफी आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले.









