क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
दि. 8 जानेवारी 2023 डी स्पोर्ट्स क्लब बेंगलोर येथे खुली राष्ट्रीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच बेळगावच्या कम्प्लीट कराटे अकॅडमीचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन 12 सुवर्ण 12 रौप्य व 20 कांस्यपदके पटकाविली. आणि तसेच दुसरी जनरल चॅम्पियनशिप मिळविली.
या स्पर्धेला भारतातील विविध राज्यातून 800 कराटे स्पर्धकांनी भाग घेतला होता. मुख्य अतिथी कर्नाटक राज्य कराटे संघटनेचे चेअरमन अल्ताफ पाशा यांनी कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर यांना दुसरा जनरल चॅम्पियनशिप सोपविली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रमेश अलगोडेकर, कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर, अक्षय परमोजी यांचे मार्गदर्शन लाभले.









